Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

प्रोग्रेसिव्ह स्कूलजवळ उघडी डीपी; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

दामोदर चौकातील धोकादायक डीपी तातडीने बंद करण्याची नागरिकांची मागणी

इंदिरानगर (प्रतिनिधी) :-

 पाथर्डी फाटा परिसरातील दामोदर चौक येथे प्रोग्रेसिव्ह स्कूलजवळ असलेल्या उघड्या व धोकादायक वीज वितरण पेट्या (डीपी) नागरिकांसाठी मोठा धोका ठरत आहेत. शाळा सुटल्यानंतर या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी तसेच पालकांची ये-जा होत असल्याने एखादी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, डीपींचे दरवाजे उघडे असून काही ठिकाणी संरक्षणाची कोणतीही व्यवस्था नसल्याने लहान मुले कुतूहलापोटी जवळ जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या उघड्या डीपी अधिक धोकादायक ठरत असल्याने तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.


विशेष म्हणजे, दामोदर चौकातील काही भागात नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी उघड्या डीपींना लाकडी फळ्या लावून तात्पुरती व्यवस्था केली आहे. मात्र, ही कायमस्वरूपी उपाययोजना नसून संबंधित विभागाने त्वरित दखल घेऊन सर्व उघड्या डीपी सुरक्षितपणे बंद कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. दुर्घटना घडण्यापूर्वीच महावितरणने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.


 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.