Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

शरयू नगरात गढूळ पाणी व ड्रेनेजची समस्या; नागरिकांचा संताप

प्रभाग क्रमांक 31 मधील शरयू नगर परिसरातील नागरिकांचे महापालिकेकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी


इंदिरानगर (प्रतिनिधी) :-

 इंदिरानगर परिसरातील प्रभाग क्रमांक 31 मधील शरयू नगर भागात गेल्या काही दिवसांपासून ड्रेनेज तुंबणे आणि घरांमध्ये गढूळ पाणीपुरवठा होण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पिण्याच्या पाण्यात गढूळपणा आढळत असल्याने नागरिकांमध्ये आरोग्याबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. त्याचबरोबर नळांना गढूळ पाणी येत असल्याने ते पिण्यास अयोग्य असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या समस्येमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.


वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना केलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तातडीने ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करून शुद्ध पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.


नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असल्याने महापालिका प्रशासनाने तातडीने या भागाची पाहणी करून ड्रेनेज व पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी होत आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.