Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

प्रवीण बंटी तिदमे यांच्या पाठपुराव्याला यश; छत्रपती शिवाजी चौक, लेखानगरसह विविध भागांना दिलासा

प्रभाग २४ मध्ये स्पीड ब्रेकर बसविण्याच्या कामाला सुरुवात; नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य

नितिन चव्हाण :, (नाशिक )

 प्रभाग क्रमांक २४ मधील वाढत्या वाहतुकीच्या समस्यांमुळे आणि भरधाव वाहनांमुळे अपघातांचा धोका निर्माण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होत्या. या पार्श्वभूमीवर नगरसेवक प्रवीण बंटी तिदमे यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून प्रभागातील विविध भागांमध्ये स्पी


ड ब्रेकर बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी चौक, लेखानगर, महाराणा प्रताप चौक तसेच इतर गर्दीच्या आणि वर्दळीच्या रस्त्यांवर टप्प्याटप्प्याने स्पीड ब्रेकर उभारण्यात येणार आहेत. या कामामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण येऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पादचारी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे काम महत्त्वाचे मानले जात आहे.

प्रवीण बंटी तिदमे यांनी सांगितले की, परिसरातील नागरिकांनी वारंवार केलेल्या मागण्या आणि सुरक्षिततेच्या मुद्द्याचा विचार करून संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून आता प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे.

या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले असून वाहतूक सुरक्षिततेसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याची भावना व्यक्त केली आहे. प्रभागातील इतर आवश्यक नागरी सुविधांसाठी देखील पुढील काळात सातत्याने पाठपुरावा केला जाणार असल्याचे तिदमे यांनी स्पष्ट केले.

🚧 प्रभाग क्र. २४ मध्ये स्पीड ब्रेकर बसविण्यात येणारे रस्ते 🚧

1️⃣ लेखानगर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्ग

2️⃣ डेक्कन पेट्रोल पंप ते महाराणा प्रताप चौक मार्ग

3️⃣ बडदेनगर ते गुलाबराव पाटील स्कूलपर्यंतचा डी.पी. रोड

4️⃣ डॉ. बाडेकर ते तुळजाभवानी रोड मार्ग

5️⃣ सद्भावना चौक ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक मार्ग

6️⃣ सोनाली पान स्टॉल ते इंदिरा गांधी चौक क्र. १ मार्ग

7️⃣ ईएसआय हॉस्पिटल ते शांतिनगर (जुने सिडको) मार्ग

8️⃣ खोडेमळा चौफुली परिसर

9️⃣ गोविंदनगर चौक क्र. १ ते चौक क्र. ५ मार्ग

🔟 मॉडर्न स्कूल ते वाघदेवी व्हिडिओ हॉल मार्ग (दोन शाळा असल्याने अत्यंत महत्त्वाचा रस्ता)

1️⃣1️⃣ सिद्धेश्वर मंदिर ते औदुंबर चौक मार्ग

1️⃣2️⃣ महाराणा प्रताप चौक ते लेखानगर मार्ग

1️⃣3️⃣ गुलाबराव पाटील स्कूल ते रुंगठा ग्रॅन्जा – कालिका पार्क मुख्य रस्ता

🛑 नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल 🛑

अपघातप्रवण रस्त्यांवर स्पीड ब्रेकर बसविण्याच्या कामास सुरुवात

संकल्पना : प्रवीण सावळीराम (बंटी) तिदमे

शिवसेना महानगर प्रमुख, नाशिक

नगरसेवक, प्रभाग क्र. २४, नाशिक

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.