Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

प्राणघातक हल्ला करणारा जाळ्यातगुन्हे शाखा युनिट-२ची कारवाई

 प्राणघातक हल्ला करणारा जाळ्यातगुन्हे शाखा युनिट-२ची कारवाई

नाशिक :नितिन चव्हाण 

जुन्या भांडणाच्या रागातूनधारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला करुन फरार झालेल्या संशयिताला गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता फिर्यादी घरासमोरील ओट्यावर बसले असताना संशयित राहुल शांताराम जाधव (वय ३१, रा. महादेवनगर, सातपूर) तेथे आला. जुन्या वादाच्या कारणावरून त्याने फिर्यादीशी वाद घालत बॅगेतून धारदार लोखंडी कोयता काढून फिर्यादीच्या डोक्यावर, हातावर, पोटावर तसेच डोळ्याजवळ सपासप वार केले होते. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने गुन्ह्याचा समांतर तपास केला. त्यात पोलीस अंमलदार महेश खांडबहाले आणि तेजस मते यांना गुप्त बातमीदारामार्फत संशयित महादेवनगर, सातपूर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. 

प्रभारीसहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी माहितीची खातरजमा झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे तसेच पथकाला कारवाईचे आदेश दिले.

पथकाने सातपूर येथील कमानीजवळ महादेवनगर परिसरात सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने रागाच्या भरात गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाईसाठी संशयिताला सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.