Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

नागरिकांना पावसाळ्यात त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाला नगरसेवक प्रविण तिदमे यांनी दिल्या तातडीच्या सूचना

मान्सूनपूर्व अभियानाचा तिसरा दिवस; प्रभाग २४ मधील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी

नाशिक :-(नितिन चव्हाण)

 मान्सूनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी प्रभाग क्रमांक २४ मध्ये मान्सूनपूर्व अभियान युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. अभियानाच्या तिसऱ्या दिवशी सदाशिव नगर, सद्गुरू नगर, कालिका पार्क आणि जगताप नगर परिसरातील विविध विकासकामांची तसेच मान्सूनपूर्व उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी शिवसेना महानगर प्रमुख तथा नगरसेवक प्रवीण (बंटी) तिदमे यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसह विविध ठिकाणी भेटी देत कामांचा आढावा घेतला.



या पाहणीदरम्यान नाले व गटारींची स्वच्छता, पावसाच्या पाण्याचा सुरळीत निचरा होण्यासाठी सुरू असलेली कामे, रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती, विविध यंत्रणांकडून खोदण्यात आलेल्या रस्त्यांचे पुनर्वतीकरण, तसेच स्टॉर्म वॉटर ड्रेनेजमध्ये कचरा साचू नये यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची बारकाईने तपासणी करण्यात आली. ज्या ठिकाणी कामे अपूर्ण किंवा संथ गतीने सुरू असल्याचे निदर्शनास आले, त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.



प्रवीण (बंटी) तिदमे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना मान्सून काळात पाणी साचणे, रस्त्यांवर खड्डे निर्माण होणे किंवा ड्रेनेज तुंबल्यामुळे नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सर्व कामे वेळेत, दर्जेदार आणि प्रभावीपणे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच नागरिकांच्या तक्रारींना तातडीने प्रतिसाद देत आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


मान्सूनपूर्व अभियानामुळे परिसरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यास मदत होणार असून, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणी टाळण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाची ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


या पाहणीवेळी नगरसेविका सौ. पूनम महाले, सागर मोटकरी तसेच महापालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.