Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

₹६.१२ कोटींच्या विकासकामांसाठी बंटी तिदमे यांचा पाठपुरावा यशस्वी; महापालिकेच्या कागदपत्रांनी वस्तुस्थिती केली स्पष्ट

  ₹६.१२ कोटींच्या विकासकामांसाठी बंटी तिदमे यांचा पाठपुरावा यशस्वी; महापालिकेच्या कागदपत्रांनी वस्तुस्थिती केली स्पष्ट


नाशिक :,नितिन चव्हाण 

प्रभाग क्रमांक २४ मधील गोविंद नगर जॉगिंग ट्रॅक (इंदिरानगर बोगदा ते आर. डी. सर्कल) नूतनीकरणाच्या प्रस्तावित विकासकामांबाबत काही व्यक्तींकडून श्रेय घेण्याचे प्रयत्न सुरू असताना नाशिक महानगरपालिकेच्या अधिकृत कागदपत्रांमुळे वस्तुस्थिती नागरिकांसमोर आली आहे.


महापालिकेच्या अधिकृत प्रस्तावामध्ये "प्रवीण (बंटी) सावळीराम तिदमे, नगरसेवक प्रभाग क्र. २४ यांची सूचना" असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी विकासकामाच्या प्रस्तावामागे नगरसेवक प्रवीण (बंटी) तिदमे यांचा पुढाकार व सातत्यपूर्ण पाठपुरावा असल्याचे अधिकृत नोंदींमधून स्पष्ट होत आहे.


गोविंद नगर परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या या प्रकल्पामध्ये जॉगिंग ट्रॅकचे संपूर्ण नूतनीकरण, आधुनिक गझीबोची उभारणी, योगा स्टेशनची निर्मिती, नवीन पथदिवे तसेच इतर आवश्यक नागरी सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व विकासकामांसाठी सुमारे ६ कोटी १२ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो मंजुरीच्या प्रक्रियेत आहे.

परिसरातील नागरिकांकडून जॉगिंग ट्रॅकच्या दुरवस्थेबाबत सातत्याने मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर नगरसेवक प्रवीण (बंटी) तिदमे यांनी महापालिकेकडे पाठपुरावा करून हा प्रस्ताव पुढे नेला. त्यांच्या प्रयत्नांची नोंद महापालिकेच्या अधिकृत दस्तऐवजांमध्ये असल्याचे समोर आले आहे.


तसेच या विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे गोविंद नगर परिसरातील नागरिकांना आधुनिक सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


दरम्यान, सोशल मीडियावर विविध दावे आणि प्रतिदावे केले जात असले तरी नागरिकांनी अधिकृत कागदपत्रांवर विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विकासकामांसाठी प्रत्यक्ष प्रयत्न करून प्रस्ताव मंजुरीच्या टप्प्यापर्यंत नेणाऱ्यांनाच त्याचे श्रेय मिळाले पाहिजे, अशी भावना परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.