Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

घरफोडीचा पर्दाफाश : महिला आरोपीच्या मुसक्या आवळल्या, साडेचार लाखांचे मंगळसूत्र हस्तगत

 घरफोडीचा पर्दाफाश : महिला आरोपीच्या मुसक्या

 आवळल्या, साडेचार लाखांचे मंगळसूत्र हस्तगत

सिडको :-नितिन चव्हाण 

अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडी आणि सोन्याचे दागिने चोरी प्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत एका महिला आरोपीला अटक केली असून तिच्याकडून तब्बल ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अंबड परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.


उंटवाडी येथील सेंट्रल पार्क परिसरात राहणाऱ्या पद्मा बाळकृष्ण मैंदरकर (वय ७५) यांच्या घरातून १ मे २०२६ रोजी रात्री ९.३० ते २ मे रोजी सकाळी १०.३० या कालावधीत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून सोन्याचे मंगळसूत्र चोरी केले होते. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरीच्या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील माहिती गोळा करत संशयितांवर नजर ठेवली. यावेळी गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना एका महिलेबाबत संशय आला. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने चोरीची कबुली दिली. आरोपी महिलेचे नाव संगीता जगन्नाथ कुलकर्णी (वय ४३, रा. शिवशक्ती चौक, सिडको, नाशिक) असे आहे.

महिला आरोपीची झडती घेतली असता तिच्याकडून ३०.२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे ४ लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई गुन्हे शोध पथकातील विलास पडोळकर, योगेश देसले, सुभाष ठुबे, समाधान शिंदे, मयुर पवार, उल्हास गांगुर्डे, केशव ढगे, सागर जाधव, संजय सपकाळे, अनिल गाढवे, फरीद ईनामदार आणि वैभव एखंडे यांच्या पथकाने केली. पुढील तपास योगेश देसले करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.