Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

नवीन नाशिकमध्ये छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

 नवीन नाशिकमध्ये छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन



नवीन नाशिक नितिन चव्हाण : 

आजची भरकटलेली तरुण पिढी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे विचार, पराक्रम आणि हिंदवी स्वराज्यासाठी दिलेले योगदान समजून घ्यावे, या उद्देशाने शौर्य फाउंडेशन मित्र मंडळ, गणेश चौक नवीन नाशिक यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक्रमामध्ये वयोगट ७ ते १७ वर्षांतील मुलामुलींसाठी नृत्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसेच पोवाडा स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धांमध्ये अनेक तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.


यावेळी हरिभक्त पारायण ह.भ.प. सोपान महाराज कनेरकर यांचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाला नागरिकांनी मोठी उपस्थिती दर्शवली.


तसेच दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळाही यावेळी पार पडला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचा सत्कार करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


शौर्य फाउंडेशन मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. तुषार पुंडलिक जगताप यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डिस्टिल एज्युकेशन चे संचालक श्री. विनेश मोरे तसेच बीमटेक इंजिनिअरिंग चे संचालक वैभव सहाणे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.