Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी! अंबड औद्योगिक वसाहतीत भीषण अपघात; दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एक ठार तर दुसरा जखमी

खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी!

अंबड औद्योगिक वसाहतीत भीषण अपघात; दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एक ठार तर दुसरा जखमी

नाशिक नितिन चव्हाण :-

 नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीतील अंबड वेअर हाउस रस्त्यावर शनिवारी (दि.१६) सायंकाळी भीषण अपघात घडला. पॉवर हाउससमोरील रस्त्यात पडलेला खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.


या अपघातात फारूक सलीम अत्तर (वय १९, रा. दत्तनगर) हा गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दुसऱ्या जखमी दुचाकीस्वारावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अंबड एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, पोलिस हवालदार सोमनाथ झोले पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, पॉवर हाउससमोरील रस्त्यावर पाइपलाइन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते. या खोदकामामुळे रस्त्यावर मोठे खड्डे निर्माण झाले असून, त्याच खड्ड्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप नगरसेवक नितीन दातीर यांनी केला आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, संबंधित विभागाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.