जयश्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित १०१ सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न
नाशिक :- नितीन चव्हाण
जय श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित १०१ सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा शुक्रवार दिनांक ८ मे २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सामाजिक एकात्मता, सर्वधर्म समभाव आणि समाजसेवेचा संदेश देणारा हा भव्य सोहळा संभाजी स्टेडियम येथे मोठ्या दिमाखात पार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार विक्रांत पाटील, पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, सुधाकर बडगुजर, गजानन शेलार डॉ. भूषण कर्डीले , महेशजीं हिरे डॉ. उमेश मराठे, विक्रांत चांगवडकर, विश्वास ठाकूर, सुनील केदार, लक्ष्मण सावजी, रश्मी हिरे
यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या संपूर्ण टीमने अतिशय परिश्रम घेतले. यामध्ये रुपाली वालझाडे, प्राची दळवी, योगिता बागुल, प्राजक्ता देशपांडे, गायत्री भटमुळे , उज्ज्वला भामरे, सीमा चौहान, सुरेखा आहेर, मोनाली चौधरी, पूनम बर्वे , पल्लवी कुँवर, समीक्षा जाधव. ,मोनाली चौधरी, नेहा पंडित पुजा गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
तसेच चि. यश मोरे डॉ. वैभव महाले आणि सूत्रसंचालन संतोष फासाटे यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष योगदान दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या वतीने जयश्री चौधरी, देवेंद्र चौधरी, सतीश चौधरी आणि पार्थ चौधरी यांनी उपस्थित मान्यवरांचे व सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
हा सामुदायिक विवाह सोहळा समाजात एकतेचा, प्रेमाचा आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण करणारा ठरला.

