Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

अंबड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी जयंत शिरसाठ

जगवेंद्र सिंग राजपूत यांची उपनगर पोलीस ठाण्यात नियुक्ती


 सिडको प्रतिनिधी :-


 नाशिक शहर पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांना पाच दिवस उलटत नाही तोच विविध पोलीस ठाण्यांमध्ये नव्या अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांची बदली करण्यात आली असून, त्यांची उपनगर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.



राजपूत यांच्या जागी अंबड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी जयंत शिरसाठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिरसाठ यांचा अंबड पोलीस ठाण्याचा पूर्वीचा अनुभव असून, याच ठिकाणी त्यांनी गुन्हे शाखेत काम केले आहे. त्यानंतर त्यांची देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली होती. पुढे त्यांनी उपनगर पोलीस ठाण्यातही सेवा बजावली.


अंबड परिसरातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक वसाहत, गुन्हेगारीच्या घटना आणि वाहतूक व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर शिरसाठ यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. यापूर्वी अंबड पोलीस ठाण्यातच गुन्हे शाखेत काम केल्याने परिसरातील गुन्हेगारीचे स्वरूप आणि संवेदनशील भागांची त्यांना असलेली माहिती त्यांच्या नव्या नियुक्तीत महत्त्वाची ठरणार आहे.


दरम्यान, जगवेंद्रसिंग राजपूत यांच्याकडे आता उपनगर पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यांच्या अनुभवाचा फायदा उपनगर परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.