Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

गळफास प्रकरणात 'मदती'च्या नावाखाली लाच!; बिटको चौकीचा अंमलदार आणि रायटर एसीबीच्या जाळ्यात

 ३० हजारांची मागणी, तडजोडीनंतर १० हजार स्वीकारताना रंगेहात कारवाई; नाशिक पोलिस दलात खळबळ


नाशिक प्रतिनिधी : 

नाशिक रोड परिसरातील बिटको पोलिस चौकीत लाचखोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाच्या प्रकरणात चौकशीचा त्रास होऊ नये आणि पुढे मदत करण्याच्या नावाखाली ३० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी बिटको चौकीचे सहायक उपनिरीक्षक मिलिंद शेजवळ आणि त्यांचा रायटर गणेश भागवत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली.



एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, दाढेगाव येथे एका तरुणाने सासुरवाडीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा गुन्हा उपनगर पोलिस ठाण्यात दाखल असून तपासाची जबाबदारी एएसआय मिलिंद शेजवळ यांच्याकडे होती. तपासात सहकार्य करण्यासाठी तसेच चौकशीत कोणताही त्रास होऊ नये, यासाठी शेजवळ आणि त्यांचा रायटर गणेश भागवत यांनी तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांची लाच मागितली.


लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली. पडताळणीत लाचेची मागणी निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला. दरम्यान, तडजोडीनंतर १० हजार रुपये देण्याचे ठरले. बिटको पोलिस चौकी परिसरात तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एएसआय मिलिंद शेजवळ आणि रायटर गणेश भागवत यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे नाशिक पोलिस दलात एकच खळबळ उडाली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.