Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

कोंबड्यांचा व्यवसाय सुरळीत करण्यासाठी गुजरात राज्यातील व्यावसायिकाकडून लाच स्वीकारताना पेठ पोलिस ठाण्याचे अंमलदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

कोंबड्यांचा व्यवसाय सुरळीत करण्यासाठी गुजरात राज्यातील व्यावसायिकाकडून लाच स्वीकारताना पेठ पोलिस ठाण्याचे अंमलदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात


नाशिक प्रतिनिधी -: 

महाराष्ट्रातून गुजरात राज्यात गावी कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या एका व्यावसायिकाला गुटखा तस्करीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्याचकडून हजारो रुपयांची लाच घेणाऱ्या पेठ पोलिस ठाण्याच्या पोलिस अंमलदार याला अटक करण्यात आली आहे.शहर परिसरात म्हसरूळ पोलिस ठाणे येथे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    


तक्रारदार हा महाराष्ट्र - गुजरात राज्याच्या जोडणाऱ्या सीमालगत नाशिक जिल्ह्यात असलेल्या पेठ तालुक्यातून कोंबड्यांची गुजरात राज्यात असलेल्या सुतारपाडा या गावी आपल्या स्विफ्ट हा वाहनाने वाहतूक करतात.अश्याच पद्धतीने कोंबड्या खरेदी करून तक्रारदार हे वांगणी परिसरातून जात असताना पेठ पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार मनोज गायकवाड यांनी त्यांचे वाहन अडवून त्यांना तू गुटख्याची तस्करी करतो.असे सांगून तुझ्यावर गुन्हा दाखल करतो असे सांगितले त्यांनंतर तक्रादर यांनी आपण अशी कुठलीही तस्करी करत नसून आपला गुजरात राज्यात चिकन शॉपचा व्यवसाय असून त्यासाठी आपण येथून कोंबड्या खरेदी करून गुजरात राज्यात जात असतो.असे सांगून देखील संशयित पोलिस अंमलदार मनोज गायकवाड यांनी तक्रारदार यांना तू गुटख्याची वाहतूक करतो आणि तुझ्या इतर गाड्या देखील अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करतात त्यामुळे तुझ्यावर गुन्हा दाखल करतो,असे करायचे नसेल तर तुला पैसे द्यावे लागतील असे म्हणून लाचेची मागणी केली.

   त्यानंतर दिनांक ०५ /०७/२०२६ रोजी संशयित गायकवाड यांनी तक्रारदार यांना फोन करून ०६ जुलै रोजी पेठ येथील तोंडवळ फाटा येथे भेटण्यासाठी बोलावले.कोंबड्यांची वाहतूक आणि गुटख्याची वाहतूक सुरळीत करण्यासाठी १ लाखांची लाच तक्रादारकडे मागण्यात आली.तडजोड अंती ९० हजार रुपये देण्याचे ठरले.त्यांनंतर तक्रादर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून या संपूर्ण प्रकरणी आपली तक्रार नोंदविली होती.

   त्यांनंतर नाशिकच्या राहू हॉटेल जवळ परिसरात असलेल्या एका चहाच्या दुकानात संशयित मनोज गायकवाड यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संशयित आरोपी पेठ पोलिस ठाणे येथील पोलिस अंमलदार मनोज गायकवाड यांना रंगेहाथ पकडले आहे.

   याबाबत नाशिकच्या म्हसरूळ पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.