Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

महानगरपालिका रणधुमाळी - नाशिकमध्ये शिवसेनेची रणनीती यशस्वी, प्रवीण बंटी तिदमे यांच्या खेळीला मोठे बळ

महानगरपालिका रणधुमाळी - नाशिकमध्ये शिवसेनेची रणनीती यशस्वी, प्रवीण बंटी तिदमे यांच्या खेळीला मोठे बळ

सिडको:- नितिन चव्हाण



राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांमध्ये राज्यभर दमदार आणि दणदणीत विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली आहे. या यशानंतर आता नाशिक महानगरपालिकेच्या रणांगणातही शिवसेनेचा आत्मविश्वास आणि संघटनशक्ती अधिक भक्कम होताना दिसत आहे.


नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना महानगरप्रमुख व माजी नगरसेवक प्रवीण बंटी तिदमे यांनी टाकलेली रणनीतिक चाल यशस्वी ठरत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत होत असून, पक्षात नव्या चेहऱ्यांचा समावेश होत आहे.


याच पार्श्वभूमीवर अॅड. अजिंक्य गीते व तेजस गीते यांनी अधिकृतरित्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. विशेष बाब म्हणजे अॅड. अजिंक्य गीते यांची शिवसेना उपमहानगर संघटकपदी निवड करण्यात आली असून, यामुळे पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला नवे बळ मिळाले आहे. या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक २१ ची ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून, स्थानिक राजकारणात शिवसेनेची पकड अधिक मजबूत झाली आहे.


प्रभाग क्रमांक २४ मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रवीण बंटी तिदमे यांच्यासह सागर वाल्मीक मोटकरी, डॉ. सौ. पुनम योगेश महाले आणि अक्षदा स्वप्नील पांगरे यांना या नव्या घडामोडींचा थेट फायदा होत असल्याचे चित्र आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असून, जनतेतूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.


एकूणच नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे संघटन, नेतृत्व आणि रणनीती अधिक धारदार होताना दिसत असून, प्रभाग २४सह संपूर्ण शहरात शिवसेना विजयाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.